पाहून घे कवितेत

Started by Balaji lakhane, September 12, 2016, 12:27:58 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

---------------पाहून घे कवितेत-------------

प्रेमाच्या कविता रचतोय फक्त तूझ्यासाठी,
माझे मनातले प्रेम तूला समजण्यासाठी.!

धुंदी चढली आहे मला प्रेमाची,
वाट पाहतोय कोमल ओठातून येणाऱ्या होकाराची.!

माझे शब्द तूझ्यापासुन सुरू होतात,
आणि तूलाच शब्दात समावून समाप्त होतात.!

लिहायला बसतो तूझ्याशिवाय सुचत नाही,
तूझ्यावर कविता केल्या शिवाय करमत नाही.!

फक्त वाहतोय बघं परी मी प्रेमात,
तू पण घेणा समावून तूझ्या ह्रदयात.!

फक्त अन् फक्त तूलाच पाहतो बघं,
कविता करताना तूलाच बोलत असतो बघं.!

मला तूझ्यात काय आवडले काही समजल नाही,
कस प्रेम झाल ह्रदयाची राणी केव्हा बनवलं कळलच नाही.!

------------बालाजी लखने(गुरू)-------------