मटका

Started by vishal gaikwad, September 13, 2016, 10:33:33 AM

Previous topic - Next topic

vishal gaikwad

कष्टच्या भाकरीला कंटाळून ,
नशिबातली पोळी शोधायला जातो
मग  उचलतो पेन ,मग गुणाकार भागाकार ,वजा अधीक करू पहातो ,
त्या वैक्तीच्या विचारला आपली सांगत देऊ पहातो .
मग सुरु होतो आकड्याचा खेळ .
टाकतो अमुक अमुक आकडा ,
मग जीव मुठीत घेऊन ३३ कोटी देवांची पार्थना करतो .
दुसऱ्याचा गाडीवर आपल्या नशिबाचा आकडा शोधतो .
मग लागतो निकाल आणि आयुष्याचा मटका  फुटतो .
तेव्हा समजत नशिबातली पोळी शोधता शोधता कष्टच्या भाकरीला आपण मुकलो .