कारण प्रत्येका हवी येथे आपल्या सोईची जात.!

Started by Rajesh khakre, September 13, 2016, 10:50:33 AM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

📌📌📌📌📌📌📌
*कारण प्रत्येका हवीय येथे आपल्या सोईची ज़ात*
✍🏻 *©राजेश खाकरे*

मी शाळेत गेलो त्यांनी माझी जात नोंदवून घेतली
मग आम्ही "सारे भारतीय माझे बांधव" ही प्रतिज्ञा रोज रोज म्हटली

त्याला पुस्तके ड्रेस मिळाली,
 मी मला मागितली तर ते म्हणाले
"तो गरीब आहे."
"मी पण गरीबच आहे."
 "तु गरीब आहेस मान्य पण तुझी जात वेगळी आहे."
दोन गरीबाची पण जात वेगळी असते हे मला त्या दिवशी कळालं.

त्याला स्कॉलरशिप सर्व सुविधा मिळत होत्या
माझी आई रोजंदारी करुन माझं शिक्षण करत होती

आम्ही सोबतच स्पर्धा परीक्षा दिली
(स्पर्धा हा शब्द थोडा चुकीचा नाही वाटत?)
तो सलेक्ट झालता मी नव्हतो झालो
मार्कलिस्ट बघितली त्याला 115 होते आणि मला 145
नंतर कळालं त्यानं फॉर्म सोबत जात प्रमाणपत्र जोडलं होतं.
स्पर्धेतही जातीची परीक्षा असते हे मला त्या दिवशी कळालं

तो सेटल झाला चांगला पैसा ही आला.
घर गाडी सर्व आलं
त्याचं मजेत चालु झालं

अधुनमधुन कुठे कुठे व्याख्यानही द्यायचा
सामाजिक विषयावर तो भरभरुन बोलायचा

एके दिवशी त्याची एका सुंदर मुलीशी भेट झाली
आणि बघताच त्याला ती खुप आवडली
 
तिच्या मनात काय हे याला नव्हतं माहीत
तीच्यावर मात्र याची बसली होती प्रित

काहीही करुन हवी होती ती त्याला
तिला मिळवण्याचा खटाटोप सुरु केला.

त्या दिवशी मात्र तो गारच पडला
तिची जात दुसरी हे माहीत झालं त्याला

खुप संतापला अन पारा त्याचा चढ़ला
जातीच्या ठेकेदारावर जोराने ओरडला

हा जातिभेद सर्व मुर्खानी तयार केला
माणूस सर्व एकच असतो कोण सांगेन यांना

मग त्याच्या व्याख्यानाचा एकच विषय असायचा
जात गाडून टाका भरसभेत सांगायचा

आतापर्यन्त साथ देणारी जात बाधक झाली होती
त्याची मात्र यामुळे पुरती गोची झाली होती

काय करावे सुचेना त्याला जात आडवी येतेय
सर्व आहे पण एका गोष्टीमुळे बैचैन होतेय
_______________________
✍🏻 *A poem by: Rajesh Khakre*
_______________________
एके दिवशी तो असाच फ़ाइल चाळत होता
रागारागाने तो जात प्रमाणपत्राकडे पाहत होता

त्याच्याकडे बघुन ते प्रमाणपत्र ही हसले
 "चुकतोयस बेटा तु, जरा विचार कर" म्हणाले,

"ज्या जातीने जगवलं तिचा तुला आता राग येतोय
फायदा बघुन तु तुझा आज स्वार्थी होतोय"

"तो बघ तुझ्यासोबतचा मुलगा खाजगी कंपनीत जातोय
माझ्यामुळे बेटा तु सुखाची रोटी खातोय

"जातिभेद वाईट हे कुणीही मान्य करेल
पण तुला तेव्हाच हे खटंकतं जेव्हा तुझ्या हिताआड येतयं "

"याआधी तुही तुझी जात अभिमानाने मिरवायचाच
जातीचे सर्व फायदे तोर्यात उचलायचा"

हे ऐकून तो थोडा स्तब्धच झाला
मनाशी काही विचार करता झाला

त्या दिवशी तो माझ्या लग्नात पाहुणा म्हणून आला
"जिंकलास गडया तूच" मजपाशी येऊन म्हणाला

रोख त्याच्या बोलण्याचा मलाही कळला होता
त्याला आवडणाऱ्या मुलीच्या गळ्यात मी हार घातलेला होता

तीच सुंदरी माझी जीवनसाथी झाली होती
कारण तिची न माझी जात एक होती

"कसं आहे ना भाऊ जीवनात प्रत्येकाला सर्वच मिळत नसतं
कुठे न कुठे आपल्याला नमतं घ्यावच लागतं

तुला तुझी जात प्यारी तशीच माझी मला ही
कशाला तत्वज्ञान सांगायचं भाऊ फायद्यासाठी काहीही

खरंच दूर करायचेत का जातिभेद चल मग दोघे मिळून करु
जातीवर नको, जो आर्थिक गरीब त्याला स्कॉलरशिप,सवलती देऊ

जात प्रमाणपत्रे कशाला वाटायची आपण भारतीय होऊ
तू अन मी एकच ही शिकवण सर्वा देऊ
 
ज्याच्यात असेल गुणवत्ता त्याचं सलेक्शन होईल
त्या दिवशी माझा देश खरा महान होईल

तु ही माणूस मी ही माणूस मग कसला आपल्यात भेद
जातीत विखुरला माणूस त्याचाही वाटतो खेद

जात हा मुद्दा भाऊ निवडणुकीतही गाजतो
दरवेळी आमचा उमेदवार इलेक्शन त्यावर जिंकतो

तुझेन् माझे लालच रक्त माणूस आपली जात
स्वार्थ नको थोड़ी आणू उदात्तता हृदयात

माहीत मजला रुचणार नाही हे कधी ही सर्वात
कारण प्रत्येका हवीय येथे आपल्या सोईची ज़ात
*©राजेश खाकरे*
_*Mo.7875438494*_
rajesh.khakre@gmail.com.
📌📌📌📌📌📌📌
कविता forward करायची इच्छा झाल्यास कविच्या नावासहित forward करावी