IIलोकशाही हीच का ती ? लोकशक्ती ठेंचती II

Started by siddheshwar vilas patankar, September 13, 2016, 01:50:42 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

उचल आसूड तो

अन ओढ अंगावरी

येऊन देत लाली

होऊ दे अंग रगतापरी  II

दिन दुबळ्यांची हि दुनिया

मूठभर लोकांच्या हाती

लोकशाहि हीच का ती ?

लोकशक्ती ठेंचती II

लोक भावना पेटवून

धर्म स्तोम माजवून

दांभिक नंगे नाचती

लोकशाही हीच का ती ?

लोकशक्ती ठेंचती II

तूच अपराधी या युगाचा

डोळे उघडे न  बंद वाचा

उकले सारे पण मौन मनाचा

हात , पाय गती मंद ती

लोकशाही हीच का ती ?

लोकशक्ती ठेंचती II

जरा भासे कुठे मंगल

क्षणी माजे धर्म दंगल

विषयांचे  प्याले सोबती

लोकशाही हीच का ती ?

लोकशक्ती ठेंचती II

उठ चल आता पुरे झाले

विषय प्याले  सोड तू

घे नवनिर्माण  ध्यास तू

ठेच मूठभर काकशक्ती

ओढ आसूड रूढीवरती

लोकशाही हीच ती

जी काकशक्ती ठेंचती II

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C