कविता II ती उभी होती किनाऱ्यावर पाठमोरी II

Started by siddheshwar vilas patankar, September 14, 2016, 03:15:27 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

ती उभी होती किनाऱ्यावर पाठमोरी

काय बोलू न कसं  बोलू

दिसतेय गोरीपान

भारतीय असली तर बरी

नाय तर कळेल आपले ज्ञान

गणू  गाई गाणे

गाई नाना उखाणे

पोर ती स्वस्थ उभी पाण्यामध्ये

गणू  गातागाता  येई टेन्शनमध्ये

अचानक एक लाट आली

पोर  नखशिखांत चिंब झाली

त्या खाऱ्या पाण्यांत भिजलेली बघून

गणूची गोत्रे ताठ झाली

चला सुरुवात झाली

भाषिक युद्धाला

तिच्या स्मितावर गणू उत्तरला

गणूच्या भाषेने गोंधळ घातला

ती म्हणाली व्हाट्स अप

गणू गालातल्या गालात गप

ती म्हणाली व्हाट्स युअर नेम

गणूने काढली बेचकी अन मारला नेम

पोर नाना प्रश्न विचारी

गणूची त्यावर उत्तरे भारी

पोर बहू हैराण झाली

गणूची हळूहळू बोबडी वळाली

गणू करे स्वगत मनाशी

हिच्यासंगे राहण्यापेक्षा राहीन उपाशी

हि तर फक्त रंगाने गोरी

हिच्यापेक्षा भारी आमच्या गावठी पोरी

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C