कविता II आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला II

Started by siddheshwar vilas patankar, September 15, 2016, 03:23:13 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

आपुल्या नात्याचा शिलालेख कल्पला

विषाद नव्हता मनी तो कसला

ना होती मनीषा अन विजिगीषा

पाषाण शोधण्यातच  हया गेली

अनभिज्ञ ,घन अन नाजूक बंधन

अक्षय संचयात किल्मिषे दाटली

पृथ्थककरणात अन निरूपणात

कैक अमावास्यां पौर्णिमा लोटली

भ्रमिष्ट अस्थिपंजर

शोध कूर्म गतीने पाषाणाचा

अनिर्वचनीय बंधनात अविरत

सोबतीने शोध अस्तित्वाचा

अनावृत  वैचित्र्य अनाहूत गाठे

यथास्थित स्थितिस्थापक

क्षणभंगुर वाटे

शिरस्त्राण बलिदान ती ज्येष्ठ नाती

पाषाण शोधण्यात दिली मूठमाती

सिद्धेश्वर विलास पाटणकर C 
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

धन्यवाद मित्रा

या कलियुगात कल्पना पण चोरल्या जातात . मूळ कवीची परवानगी न घेता नावावर खपवल्या जातात . शब्दांचे खेळ खेळून कवितेचा मतितार्थ बदलत नाही, हे त्या चोरांना लक्षात येत नाही.
अन्यथा आपल्याला जागोजागी विंदा आणि केशवसुत दिसले असते . एक नम्र विनंती तुम्हास जर असे कल्पना चोर दिसले तर त्यांना मूळ कवितेचा आहेर भेट द्या .
आपल्या सुंदर अभिप्रायाबद्दल मंडळ आभारी आहे

सिद्धेश्वर विलास पाटणकर
सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C


siddheshwar vilas patankar

सिद्धेश्वर विलास पाटणकर C