* एक नाजुक काळीज *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 15, 2016, 11:15:31 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे


बघ सये तु
नीट इकडे
आहे एक नाजुक
काळीज माझ्याकडे

म्हणशील तर देईल
मी कायमच तुझ्याकडे
नाहीतर बरंय ते
मस्त माझंच माझ्याकडे

जर जपुन ठेवशील
हळुवार प्रेमाने गोंजारशील
तर आपोआपच चालत
येईल ते तुझ्याकडे

समजुन खेळणं खेळशील
आदळआपट करशील
तर होतील तुकडे तुकडे
विखुरले जातील चहुकडे
     म्हणुनच सांगतोय
बघ सये तु
नीट इकडे
आहे एक नाजुक
काळीज माझ्याकडे.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938