प्रेमातल दुःख

Started by RAM NAKHATE, September 17, 2016, 12:06:41 AM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

प्रेमातल दुःख
••••••••••••••••••••••••••••••••••
सुख दुःख सारे दावीले डोळ्यानी
डोळ्यातुनी सांगावी वेदना कोणाशी.....
शब्द नाही फुटतात मुखाला
डोळ्यातली ही संवेदना दिसेल का कोणाशी ......

असे झाले माझे प्रेमात तिच्या
मैत्रीचे आहे विशाल नाते आमचे....
माझ्या मनातले राहीले गीत गायचे
मी आहे मित्र तीचा नाही राहीले भान मनाचे....

भ्रम होता प्रेमाचा माझा जुना
फसवली तिने मैत्रीच्या नात्यात मला....
शब्द मला नाही फुटले त्यावेळी
बोलत होती तेंव्हा ती मला....

वेदना होतात आज मला
मनात रुतलाय हा काटा....
बोललो नाही मी तिला
माझ्यात शब्दने लाविल्या माज्या वाटा....

आनंदाच प्रेम मिळेल जेंव्हा मला
होईल जेंव्हा स्पर्श तिचा खर्या प्रेमाला....
सांगेन मी जेंव्हा हालत माझी तिला
करेल हर्षाचा कल्लोळ ती ऐकुण या प्रेम कहाणीला....
                           - नखाते राम
                   मो.नं. ९५४५०१३६७९
                    मु. मांडणी, ता.अहमदपुर,
                        जि. लातुर