बोल माझे

Started by RAM NAKHATE, September 17, 2016, 12:10:37 AM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

बोल माझे
••••••••••••••••••••••••••••••••
मी तुला बोलत नाही म्हणुन
शब्द कागदावर उतरतात...
बोलायला गेलो तरी
मुखातुनी शब्द फिरतात...

तुला पुन्हा एकदा नयन
माझे डोळे भरुन पाहतात...
तुला पाहीलोतर आणखी
नयन माझे पाडावतात...

बोलायचं होत तुला खुप
पण बोल माझे नाही फुटत...
बोलायच म्हणटल तर शब्द
माझे मुकेपण धरुन येतात...

बोलण्याची हुर ही शब्द
होऊन कागदावर येतात...
तुला बोलण्याआधी बोल
माझे मुके होऊन जातात...

बोलतो मी एकदा तुला
जसे शब्द मुखात येतात...
बोलण्याआधी वाटे मला
बोल माझे तुलाच बोलतात...
                  - नखाते राम
          मो.नं. ९५४५०१३६७९
        मु. मांडणी, ता. अहमदपुर,
                   जि. लातुर