प्रेमासाठी कवीता

Started by RAM NAKHATE, September 17, 2016, 12:51:23 AM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

       प्रेमासाठी कवीता
•••••••••••••••••••••••••••••••
लिहतोय मी कविता प्रेमाची
कडव्या बोलाची, गोड शब्दांची...
ओळख नव्हती मला कवीतेची
कवीतेतील त्या गोंडस शब्दांची...

लिहण्याचा प्रयत्न केला मी प्रेमासाठी
नाही केल प्रेम मी कवी होण्यासाठी...
प्रेमासाठी कवीता केली कवीतेवर प्रेम नाही
लिहाय लागलो मी कवीता तिच्यासाठी...

जी आवडते मला खुप खुप
ती नाही मिळाली हे दुःख झाले खुप...
हे दुःख मनी गोठलेत आता खुप
वाटले प्रेमात होईल दुःखाचे तुप...

दुःखात चढलो मी दुःखी पर्वत हा
सुखाची ना चालु शकलो पाऊल वाट ही...
प्रेम जणु हे सुख, दुःखाचा ताजवा हा
तोलताच जणु दुःख सारे ओसंडली ही...

नाही कळले जरी हे प्रेम तीला
पण वेदना या होतील माझ्या मनाला...
मनात रुतला हा वेदनेचा काटा
प्रेमात माझ्या विस्खळल्या या  वाटा...
                            - नखाते राम
                       मो.नं. ९५४५०१३६७९
                      मु. मांडणी, ता. अहमदपुर,
                                 जि. लातुर