कॉलेज मध्ये..

Started by विनायक आनिखिडी, September 17, 2016, 09:00:49 AM

Previous topic - Next topic
कॉलेज मध्ये..

कॉलेज मध्ये आम्हालाही
पोरगी का पटत न्हवती
एवढ्या साऱ्या होत्या त्यातली
एक देखील गटत न्हवती

थोडी चूक आमची देखील,
त्या मध्ये नक्की होती
तारुण्यावर बालपणाची,
अजून गाठ पक्की होती

कोणी म्हणायचं, यायचं का
कॉफी प्यायला जाऊ
आम्ही आपले जिम मध्ये
डबा खाऊन घेऊ

कोणी चीअर करत असे
आमच्या त्या खेळाला
थ्यांक्यू, म्हणून आम्ही फक्त
लागलो पुन्हा खेळायला 

कोणी म्हणे, कॅम्पस मधल्या 
झाडा खाली आभ्यास करू
आम्ही म्हणायचो, लायब्ररीत
पहिल्या बाकावर बसुन घेऊ

कोणी देत फुल आणून
छान सुगंधी आम्हालाही
आम्ही म्हणायचो बर झाल
देवा पुढे वाहायला

वाटतं थोड उशिराच,
कॉलेज ला आम्ही जायचं होत
मुलींच्या त्या मनाला,
वाचायला आधी शिकायचं होत

                                     विनायक अनिखिंडी

sagar rale dapoli



Sama