विरह गीत

Started by Prabhakar bhasme, September 17, 2016, 11:39:23 AM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

जाणता अजाणता....

जवळी असूनी भासते
जाणता अजाणता
पहिल्या भेटीत गुंतले
जाणता अजाणता

वेलीवर फूल उमलले
वा-यावर हळूच डोलले
त्या आठवणींच्या गीतात गुंतले
जाणता अजाणता

जवळी घेताना डोळे मिटले
तुझ्या या प्रेमात गुंतले
विसरू कशी मी तुला सांगता
जाणता आजाणता

जाग येता तुला पाहिले
ओठांवरले हसू लपविले
तुला हे सर्व कसे समजले
जाणता आजाणता

तुझ्या स्वप्नात रंगले
आठवणीत तुला पाहिले
एकांती असताना जवळी घेतले
जाणता अजाणता....

प्रभाकर भस्मे , ठाणे
9757135696