मन झाले बावरे

Started by Prabhakar bhasme, September 17, 2016, 03:29:35 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

 मन झाले बावरे....

मन झाले बावरे रे विठ्ठला
तुला पाहुन वेड लागले मला
तुझे रुप सुंदर, वाटे अति सुंदर
मनमोहना सावर रे मला

तुझीच रे ही किमया
वारकरी नाम घेती सदा
पुण्य झाले क्षणात माधवा
तुच माझा सखा पांडुरंगा

तुझीच ओवी सुंदर,, जानाबाई
विठ्ठल उभा राही संगे रखुमाई
प्रेमाने नाते जोडी अखंड नामाने
तुच माझा सावळा, भेटी लागी जीवा

ज्ञानोबाला सहाय्य केले विठ्ठला
नाम मंत्र दिला निवृत्तीनाथा
सर्व संत एक झाले तुझ्या नामाने
विसरु कसा मी तुला पांडुरंगा....

प्रभाकर भस्मे , ठाणे
9757135696