तूच सांग या वेड्या मनाला

Started by maddy pathan, September 17, 2016, 09:34:37 PM

Previous topic - Next topic

maddy pathan




पापण्यांचे पंख लावून आज उडू पहातंय पाखरू,
तूच सांग या वेड्या मनाला आता कसं आवरू?

खूप समजावलं त्याला,
अरे क्षितीज असतं फसवं गवसल्यासारख वाटतं,
तिथेच शोध होतो पुन्हा सुरु,

इंद्रधनुचे सप्तरंग आपल्यासाठी नसतात रे,
सगळ हरपून बघ पण त्याची आस मात्र नको धरू,

आकाशीचे चंद्र -तारे फक्त अंधाराचेच सोबती ,
त्या आभासाच्या मागे तू नको रे गरगर फिरू,

रहाता राहिला सूर्य अरे तो तर आपला कधीच नसतो,
जवळ त्याच्या जाण्याचा तर विचारसुद्धा नको करू,

एकूण काय आभाळ नसतं आपल्यासाठी ,
आपली स्वप्न जमिनीवरची उडण्याच्या या हट्टापायी त्यांनाच नको विसरू,

मग ते म्हणालं एकदाच मला उडू दे,
पंखांची ताकद आजमावूदे, वाळूतली मृगजळसुद्धा उडता -उडता पाहूदे,

फार तर काय होईल?
पापण्यांचे पंख अश्रूंनी भिजतील पण माझा प्रयत्न सच्चा होता,
याचं समाधान तरी राहील,

शेवटी मग मीही म्हटलं उडू दे बापड,
आज त्याचाही हट्ट पुरा करू सरळ बळ पंखातलं तर आपणच एकमेकांना सावरू.

मॅडी.9975086836.

मुलींसाठी व मुलांसाठी स्पेशल ग्रुप ज्वाइन होण्यासाठी वरील नंबर वर व्हाट्सऐप करा.