हेच पडतात स्वप्न निद्रेला...!

Started by RAM NAKHATE, September 17, 2016, 11:42:09 PM

Previous topic - Next topic

RAM NAKHATE

हेच पडतात स्वप्न निद्रेला...!
•••••••••••••••••••••••••••••••••••
सांजवेळी आलीस तु
माझ्या आठवणीत एकदा...
आठवणीत पुन्हा तुच
मनात दुःखाचे वादळ एकदा...

हेच पडतात स्वप्न निद्रेला...!

का आलीस तु चांदण्या रातीला
आठवणीत तुझ्या मीच एकटा...
आठवणीत तुझ्या पाहुनी चांदण्यांना
उजेडात उभा मीच तो एकटा...

हेच पडतात स्वप्न निद्रेला...!

मनात सागर उसळले दुःखांचे
चंद्रमाच्या चांदण्यात चंद्र परतुनी आला...
का आलाय परतुनी पुन्हा परत एकदा
घेऊनी सोबती आठवणीला देण्यास मजशी आला...

हेच पडतात स्वप्न निद्रेला...!

हेच ते दुःख मला दिसले
पाहुनी गगनात चंद्र, तार्याला...
हीच खळबळ होते मनास
पोर्णिमेचा चंद्र का नाही आमावसेला...

हेच पडतात स्वप्न निद्रेला...!

दुःखाचे वादळ सुटले मनाला
आमावसेचा अंधार झाला...
पोर्णिमेचा चंद्र पुन्हा परतुनी आला
आनंदाचे दुःख झाले मनाला...

हेच पडतात स्वप्न निद्रेला...!
             
                - नखाते राम
         मो.नं. ९५४५०१३६७९
        मु. मांडणी, ता. अहमदपुर,
                 जि.लातुर.