बहाणा !!!

Started by श्री. प्रकाश साळवी, September 18, 2016, 09:06:54 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

बहाणा !!!
--------
तुझ्या हासण्याने झाले सारे कसे दिवाणे
तू सोड आता सखे खोटे तुझे बहाणे
**
गालात चंद्र हासे तुझ्या या मिठिला
स्पर्शात धुंद झाले गाती असे वीराणे
**
वारा असा खट्याळ सांभाळ तुझ्या ओढणिला
कवनात बांधिले गं तुझे हे तराणे
**
तू अशी लाजली गं बागेतल्या कळ्यांशी
मंत्रमुग्ध मन झाले असे तुझे पहाणे
**
डोलते अशी ही बट तुझ्या कुंतलांची
गातील गोडवे तुझी ही रामायणे पुराणे
**
गाशिल का तू गीत माझे सदा तू हसावे
रंध्रात शिंपले हे गाणे तुझे दिवाणे
**
प्रकाश साळवी

KalpananchaPaus