ती आणि मी

Started by Tejas Harish Jadhav, September 20, 2016, 04:47:20 PM

Previous topic - Next topic

Tejas Harish Jadhav

मैत्री करणारा मी तोडणारी ती
प्रेम करणारा मी नाकारणारी ती

हसवणारा मी हसणारी ती
रडणारा मी रडवणारी ती

सुख देणारा मी घेणारी ती
दुःख झेलणारा मी देणारी ती

अन

रागावणारी ती मनवणारा मी
आनंदी असावी ती तो आनंद द्यावा मी

आठवणीत येणारी ती आठवण काढणारा मी
तिरस्कार करणारा ती प्रेम करणारा मी

विष देणारी ती अमृत मानणारा मी
आशय असणारी ती कविता लिहणारा मी

तेजस हरीश जाधव
+91 7738137299