Ganbhir kavita

Started by Prabhakar bhasme, September 20, 2016, 09:48:54 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

आठवणींची माळ


का कळेना कसे घडले  ?
अर्ध्या वाटेवर स्वप्न भंगले
ओठावरला घास गेला
रंगलेला डाव अर्ध्यावरच संपला

स्वप्ननांची दुनिया विखरुन गेली
आशेची स्वप्ने भंग झाली
आधाराचा व्रुक्ष कोसळुन गेला
रंगालेला डाव अर्ध्यावरच संपला

कपिलेची हाक येऊन गेली
आठवणींची माळ हातात राहिली
डोळे पुसुन दिवस गेला
रंगलेला डाव अर्ध्यावरच संपला

मायेची पाखरे दूर गेली
तुझ्याविन पोरकीच राहिली
यशाची शिखरे राहुन गेली
रंगलेला डाव अर्ध्यावरच संपला

प्रभाकर भस्मे   ठाणे

9757135696