मन झाले बावरेआ

Started by Prabhakar bhasme, September 20, 2016, 11:17:14 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

श्रावणधारा


झर झर वाहुनी वनी आल्या श्रावणधारा
ओलेचिंब करुन गेला वात्रटवारा
गालावरले हसु टिपुन गेल्या पर्जन्यधारा
आठवणींची ओढ राहिली तुझ्या सहवासाची धारा


तू आणि मी हे नाते न राहिले
तुझ्यात मी अन माझ्यात तू हेच राहिले
विश्वासाने टाकले पहिले पाऊल वेगळे
आठवणींची ओढ राहिली तुझ्या सहवासांची धारा

ओठ चुंबुनी वनी गेल्या या श्रावणधारा
या आठवणींची ओढ येते काय जरा
हरवून टाकते या सुखाच्या धारा
आठवणींची ओढ राहीली सहमिलनांच्या रांगा


मिलिंद कुंभारे