नाती

Started by vikrams13, September 21, 2016, 11:45:55 AM

Previous topic - Next topic

vikrams13

नाती
काही नाती नुसती नावाला
आपली असतात
पण जेव्हा गरज असते त्यावेळी
कुठेतरी गायब होऊन बसतात

जवळ असून देखील  ते
आपल्यापासून लांब असतात
पण काही इतकी जवळ असतात
जी आपल्या रक्ताची हि नसतात

ती नाती आपल्याला गरज असतात
आपल्यासाठी काहीही काहीही करतात
परंतु काही रक्ताची नाती खोटेपणाचा
आव आणून सोबत असल्याचा दाखवतात

काही नाती अशी घट्ट  जोडली जातात
जी आपल्या रक्ताची हि नसतात
हि नाती सदैव आपल्या सुखापेक्षा
दुःखात नेहमी सामील होत असतात

                             -विक्रम सरक
Vnsarak