दे धक्का...! जगणं समानतेचं

Started by शिवाजी सांगळे, September 22, 2016, 05:39:00 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

जगणं समानतेचं

होवु पहातोय रे महासत्ता
स्वातंत्र्याची सत्तरी येतांना,
तरीही तोडू शकलो नाही
आम्ही जातीधर्मांच्या बंधना !

शक्तीप्रदर्शने होतात नित्य
आरक्षाणाच्या ध्येय्या साठी,
वेळ आली आहे मित्र...हो
सर्व समानतेने जगण्या साठी!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९