मी

Started by Nikhil kalamkar, September 22, 2016, 10:20:24 PM

Previous topic - Next topic

Nikhil kalamkar

                                    मी
रोजच्या या धकाधकीच्या जीवनात आता असा गुरफटुन गेलोय
कि मी म्हन्जे पैसा आणि पैसा म्हन्जे मी
कधी वाटतं विचारवं या मनाला
कशासाठी आलोय या जीवनात
पैशाची कागद गोळा करायला की
त्याच कागदांसाठी आपल्या शरीराची काड करायला
अशाच या आपल सर्वस्व असलेल्या कागदावर मागे पळता
पळता जीवनाचा कागद कधी संपेल माझ मलाही कळणार नाही
जो पर्यंत तुमच्या कडे आहेत या किमती कागदांनी भरलेली कपाटे
तो पर्यंत असताील या जमिनीवर कागदां मागे धावनारे गोळे तुमच्या मागे
कदाचित मला जमतहि नसतील जास्तीत जास्त कागदांची
गाठोडि बांधायाला
कदाचित याच मुळे मला कमी किम्मत आहे या कागदांच्या दुनियेत
आपले अस्तित्व निर्माण करण्याच्या नव्या छंदाकडे धावण्याचे वेड लागलय
पण मला कुठ माहिती आहे की देवाने पैशालाच या दुनियेत अस्तित्व म्हणून धाडलय
म्हणून मला आता अस वाटतंय  आपनही काळाबरोबर अस वागाव
की मी म्हन्जे पैसा आणि पैसा म्हन्जे मी
कवी - निखिल कळमकर