विरह गीत

Started by Prabhakar bhasme, September 22, 2016, 10:57:51 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

नवा नूर

श्वासात श्वास अन गंध नवा राहू  दे
या भेटीत मला सुखावुन राहु दे
पळ येतील अन जातील
या सुखाचा नूर पकडु दे मला

प्रियकरा हे शब्द माझे तोकडे
अर्थाविन समजु नको वेडेवाकडे
पळभरात अर्थ समजला गूढार्थ यातला
या सुखाचा नूर पकडु दे मला

सांजवात राहु दे त्या प्रकाशात उजळु दे
तुझ्या डोळ्यातिल गंध नवा राहू दे
तुझ्यासवे एकरुप होऊ दे मला
या सुखाचा नूर पकडु दे मला

देहाच्या बोलीत रमवू नको मला
शब्द थोडे त्या मिठीतला अर्थ वेगळा
स्वर्ग सुखाचा आनंद वेगळा
या सुखाचा नूर पकडु दे मला

प्रभाकर भस्मे   ठाणे
9757135696