एका फुलराणीच्या

Started by k.suhas, September 24, 2016, 02:24:29 PM

Previous topic - Next topic

k.suhas

एका फुलराणीच्या प्रेमात
ती जास्वदांच्या फुलासारखी,किती सुंदर दिसायची
या डोळ्यातून सरळ हृदयात उतरायची...

अंगणात बसुन रंगीत रांगोळी काढायची
गुलाबाचे फुल तोडून पाकळ्या मोजत बसायची
गालातल्या गालात हसायची
सुरेल काहीतरी गुण गुणत असायची

मी दुरूनच तिला निरखायचो
तिच्या चेहऱ्यावरील भाव टिपायचो
तिच्या हसण्यात भान विसरायचो
तिच्या स्वप्नांना मनात जपायचो

माझ्या सारख्या फुलपाखराची जणू ती एक फुलराणी होती
काय सांगू मित्रा ती किती गोड दिसायची ....
काय सांगू मित्रा ती किती गोड दिसायची .....

कवी सुहास
9272321306[/font][/i][/b]
प्रा.सुहास काकडे
9272321306
suhas.kakde@gmail.com