संताचे दर्शने

Started by विक्रांत, September 24, 2016, 08:34:32 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



संताचे दर्शने सुखावले मन
घडले साधन काही एक ||
संतांचे संगती कळले उपाय
चुकलेले पाय सावरले  ||
संतांचे भाषण हळूच फुंकर
पोळले जिव्हार शांत झाले ||
संतांचे चरणी विक्रांत लागला
हरवला पथ दिसू आला  ||


डॉ विक्रांत प्रभाकर तिकोने
http://kavitesathikavita.blogspot.in