शब्दच्छल

Started by विक्रांत, September 24, 2016, 08:43:46 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



निर्थकता जीवनाची
माझ्या मलाच कळाली
अवघीच जिंदगानी 
काळ ओघात चालली

म्हणतात कुणी इथे
श्रेय तयास मिळाले
रे आम्हा काय फिकीर
काय कुणास मिळाले

रिकाम्याच झोळीचे या 
ओझे आता मी जाणले 
होवो आता कडेलोट
वा राहो पाणी साठले

भजने माझीच होती
माझीच अंध मग्रूरी
मनाचाच खेळ सारा
चित्रे धुरातील सारी

चला झाला पुरे आता
शब्दच्छल मांडलेला
मरणात या क्षणाच्या
हा श्वास आहे चालला 

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in/