शहीद

Started by Asu@16, September 25, 2016, 09:16:59 AM

Previous topic - Next topic

Asu@16

      शहीद

देशाच्या सीमेवरती
जवान शहीद झाले
डोळ्यांनी अश्रू गाळून
फक्त अभिवादन केले
      कोण कुणा पुसणार
      काय कुणाचे गेले ?
काठीचा आधार घेऊन
मायबापाचे मूल गेले
स्वप्नांच्या चिंधड्या करून
चिमण्यांचे बाप गेले
      कोण कुणा पुसणार
      काय कुणाचे गेले ?
अर्ध्यावर डाव मोडून
कुंकू पुसून गेले
कुणाच्या पापापायी
घरदार उध्वस्त झाले
      कोण कुणा पुसणार
      काय कुणाचे गेले ?
बंदुकीच्या फैरी झाडून
चंदनाच्या चितेत गेले
शाही सन्मान घेऊन
जयघोष निनादत गेले
      कोण कुणा पुसणार
      काय कुणाचे गेले ?
मरतांना चिंता करीत
आप्त आठवित गेले
देशाची चिंता करून
तिरंगा पांघरून गेले
      कोण कुणा पुसणार
      काय कुणाचे गेले ?
'देशावर कुर्बान झाले' 
म्हणता पाय लटपटले
सूर्योदय आठवून उद्याचा
हृदय पित्याचे तटतटले
      कोण कुणा पुसणार
      काय कुणाचे गेले ?

- अरुण सु.पाटील   

https://www.facebook.com/AsuChyaKavita