गहिवरलं

Started by Nikhil kalamkar, September 25, 2016, 12:19:11 PM

Previous topic - Next topic

Nikhil kalamkar

                                 गहिवरलं
नाही भेटली एक दिवस म्हणून विचारलं तिच्या मैत्रिणीला
मैत्रिण म्हणाली
ति दवाखान्याच्या बंद खोलीत शेवटचा श्वास घेते आहे
क्षणो क्षणी मात्र तुझाच जप करते आहे
भेटायला गेलो तिला अन विचारलं हे काय झाले
त्यावर ति उत्तरली
विसरून जा मला माझे शेवटचे क्षण आले
म्हणून विचारलं डॉक्टरांना काही तरी उपाय असेल
त्यावर बोलले डॉक्टर ह्रदय बदलावे लागेल
मी ही म्हंटलं
मी देतो ह्रदय माझे कोणालाही सांगू नका
माझ्या हृदयाचा बाजार जगा समोर मांडू नका
विसरलो नाही तुला ही चिठ्ठि लिहून ठेवतोय
काळजाच्या वेदना मात्र आकांताने भोगतोय
घेतलाच दुसरा जन्म तर तुझाच होउन येईल
पण या जन्मी मात्र तुझेच ह्रदय बनून राहिल
कळून चुकले तिला कि हे काय घडले आहे
श्वास आहे माझा परंतु ह्रदय मात्र तुझे आहे
विसरू नकोस वेडे पत्र शेवटचे लिहितोय
पुढच्या जन्मी मात्र तुझेच ह्रदय बनून येतोय
तुझेच ह्रदय बनून येतोय
कवी- निखिल कळमकर