*** कधी तु... कधी मी.. ***

Started by धनराज होवाळ, September 27, 2016, 11:17:55 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ


❤ *कधी तु... कधी मी...* ❤

कधी मी तिला समजुन घेतो,
पण समजुन ती ही घेत नाही..
कधी ती मला समजुन घेते,
पण समजुन मी ही घेत नाही..!!

कधी मी उगाच नाराज होतो,
पण रुसवा ती ही काढत नाही..
कधी उगाच ती नाराज होते,
पण रुसवा मी ही काढत नाही..!!

कधी लटकं भांडण मी करतो,
पण साॅरी ती ही बोलत नाही..
कधी खोटं भांडण ती करते,
पण साॅरी मी ही बोलत नाही..!!

कधी मला बोलायचं खुप असतं,
पण माझं ती ही ऐकत नाही..
कधी तिला बोलायचं खुप असतं,
पण तिचं मी ही ऐकत नाही..!!

कधी मला रडायचं खुप असतं,
पण मिठीत ती ही घेत नाही..
कधी तिला रडायचं खुप असतं,
पण मिठीत मी ही घेत नाही..!!

तरीही आम्हाला एकमेकांची ओढ,
कारण प्रेम कमी ती ही करत नाही...
आम्ही कधीतरीच खोटंनाटं भांडतो,
कारण प्रेम कमी मी ही करत नाही...!!!
-
👼 प्रेमवेडा राजकुमार 👼🏼
(धनराज होवाळ)
कुंडल, जि. सांगली
मो. ९९७०६७९९४९
🙏🌹❤👼❤🌹🙏🏻