स्वप्न...!!!

Started by Ashok_rokade24, September 27, 2016, 09:37:41 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

एक कलेवर हिंडते, आत्मा नसलेले ,
स्वप्न घेऊन संगे, जे ऊरी जोपासलेले॥

कुणाची करावी आस, कुणाची धरावी कास,
हळूवार मन हे, नित फसले मृगजळास, ॥

जपला ठेवा अंतरी, काही सुखद क्षणाचा,
संपले सर्व काही, ऊरला खेळ स्वप्नाचा ॥

जे भोगीले सुख, आठव त्याचा करीतो,
जे न घडले कधी,स्वप्न त्याचे पहातो ॥

माझे असती जे,  साथ त्यांची मिळेना,
कुणास म्हणू आपले, माझे मलाच कळेना॥

वाट त्यांची वेगळी, ज्यांची करीतो आस,
जानीव असूनी पुन्हा , का फसतो मृगजळास ॥

शोध सुखाचा घेता घेता, अंत जवळ आला ,
क्षण सोन्याचा भोगण्या, जीव वंचित राहीला ॥

असेच कंठावे आता , जिवन राहीलेले,
शोधीत रहाणे आता , क्षण जे भोगलेले ॥

एक कलेवर हिंडते , आत्मा नसलेले ,
स्वप्न घेऊन संगे, जे ऊरी जोपासलेले ॥

                            अशोक मु. रोकडे.
                             मुंबई.