गंभीर कविता

Started by Prabhakar bhasme, October 01, 2016, 04:51:20 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

रणरागिनी


डोळ्यात आणू नको पाणी
तू तर योगिनी महाश्वेताग्नि
तू तर कारुण्याची मूर्ती प्रेमळ मूर्ती
तू श्वेताग्नि विश्वयोगिनी
टाक पाऊल होऊ दे रणरागिनी

भ्याड मर्दांनो तुमची सेवा केली आता पुरे
होईल रणरागिनी करीन चिंधड्या एकेक कणा एवढी
प्रेम पाहिले आता पहा रणरागिनी श्वेताग्नि
कारुण्याच्या पदराआड आहे रणरागिनी द्वेषाग्नि


जगाची आई  जनतेची माई पाहिले नाहीस का दुर्गादेवी
उग्ररुप अग्निरुप करीन खांडोळी क्षणात बाई
दिव्यत्वाची येईल प्रचिती जेव्हा होईल नामरुप प्रुथ्वी
भ्रम निराश होईल जेव्हा कारुण्याची मूर्ती होईल योगिनी


स्वरचितकाव्य  प्रभाकर भस्मे
9757135696