दूर जाता येत नाही..

Started by Balaji lakhane, October 02, 2016, 07:51:43 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

............... दूर जाता येत नाही.............

आता नको गं रूसू,
माझ्या ह्रदयाची राणी माझ्यावर.!
फक्त तुझाच हक्क आहे,
सखे माझ्या कोमल मनावर.!

खोट सांगत नाही तुला,
खुपच बोलावे वाटत होते.!
पण कसे बोलू तुला ,
मला काहीच समजत नव्हते.!

तुझ्या पासुन खुप दूर,
जाण्याचा प्रयत्न केला.!
जाता येत नव्हते मला,
ह्रदय तुझ्या जवळ आला.!

मी च बोलत होतो ,
रडत पोरी माझ्या मनाला.!
का रे तू येवढं सतवतोस,
त्या नाजूक फुलपाखराला.!

गळ्यातुन सुर माझ्या रोज
धावत धावत येत होते.!
तू समोर येताच माझ्या,
सुर बाहेर पडत नव्हते.!

चोरून चोरून पाहत होतो,
सारखच सखे मी तुला.!
तू तुझ्या जागी बरोबर
आहेस समजल नव्हत मला.!

चुक झाली माझी परी,
अस करणार नाही पुन्हा.!
प्रेम तुझ्यावर सात जन्मा,
नंतरही करणार पुन्हा पुन्हा.!

आता तू ही नकोस पिल्लू,
रागावूस माझ्यावर.!
तुझ्याशिवाय येणार नाही कोणी,
तुलाच कोरलय माझ्या मनावर.!

तू पाहिलीच असचील,
दोन तीन दिवस माझी अवस्था !
वेडा झालो होतो बघं मी,
काय सांगु मनाची अवस्था.!

तू दिसत नव्हती तेव्हा मन,
कावरे बावरे होऊन शोधायचे.!
तू प्रिये समोर असली ना माझ्या,
ह्रदयाचे धडधडणे सुरू व्हायचे.!

------------बालाजी लखने(गुरू)--------------
              उदगीर जिल्हा लातुर
              भ्र. ८८८८५२७३०४