तू जिवन

Started by Balaji lakhane, October 02, 2016, 07:53:54 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

----------------तू जिवन----------------

रक्ताच्या शाईने रोज लिहीतो तुला पत्र,
जिवनभर असच सुरू राहील हे सत्र.!

पत्रात आहे फक्त माझ्या मनातल ,
कोऱ्या पानात प्रेम माझ रेखाटल.!

ह्रदयात माझ्या आहे तुझीच प्रतिमा,
माझ्या प्रेमाची कोणतीच नाही सिमा.!

माझ्या जिवनातले तू अनमोल वळण,
तुलाच मानल जिवन तुलाच मरण.!

ह्या अबोल शब्दांची आहेस राणी,
माझ्या जिवनाची झालीस तू कहाणी.!

वाचून बघं सखे माझे तू मन,
रक्तानं लिहिल पत्रात तुझेच वर्णन.!

गेल्या सात जन्माची अपुर्ण प्रेम कहाणी,
ह्या जन्मात आपण पुर्ण करू राणी.!

समावून घेतलं तुलाच माझ्या ह्रदयात,
तुलाच उच्‍च स्थान दिलं जिवनात.!

-----------बालाजी लखने(गुरू)------------