मिठ्ठी..

Started by Balaji lakhane, October 02, 2016, 07:56:13 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

...............मिठ्ठी..................

माझ्या मिठ्ठीत तुला घ्यायचयं,
तुझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचयं.!

हळूस ओठात ओठ मिळवायचयं,
तुझ्या नयनाला नयन भिडवायचयं.!

मनात प्रेमाची बाग फुलवायचयं,
प्रेमाच्या बागेत तुझ्या सवे राहायचयं.!

मनातल सर्व काही बोलायच,
तुझ्याशी बोलुन मन तुझे जिकायचयं.!

तुझ्या सोबतच जगण्याच श्वास घ्यायचयं,
जिवनातल प्रत्येक सुख तुला द्यायचयं.!

फक्त तुझ्यासाठीच मला जगायचयं,
फक्त अन् फक्त तुझाच व्हायचयं.!

माझ्या हाताने तुला सजवायचयं,
तुझ्या गालावरच लाजन पाहायचयं.!

माझ्या मिठ्ठीत तुला घ्यायचयं,
तुझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचयं.!

--------बालाजी लखने(गुरू)--------