श्रुंगारिक कविता

Started by Prabhakar bhasme, October 02, 2016, 04:19:29 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

  प्रेम गीत

धुंद एकांत हा
तुझा सहवास हवा
विरहाचे दुःख संपता
येई सुखाची मीलनता

तुझ्या शब्दाने मन सुखावले
दोघातील अंतर संपले
जाणिवेचे बंध सुटता
येई सुखाची मीलनता

आता नाही शब्दांचे कवडसे
धुंद हे जग सारे तुझ्यासवे
अधुरे वाटते सारे तुला पाहता
येई सुखाची मीलनता

तुझ्याविन ही शब्दांची व्याकुळता
थांबविता येईना तुला पाहता
तुझ्या ओठातील सांगे मधुरता
येई सुखाची मीलनता

स्वरचित काव्य   प्रभाकर भस्मे
                        9757135696

guru21