प्रेमगीत

Started by Prabhakar bhasme, October 02, 2016, 05:50:33 PM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

  तोच चंद्रमा नभात

तीच नीलीमा नभात
आठवणी गोळा झाल्या मनात
तू जवळी असता
विसरले सर्व एकांत
तुझा हात हातात असता
माझा मी न राहिलो स्वतःत
तुच माझ्या ह्रदयात
फिरुन येशिल का पुन्हा एकांतात

दीप मावळले नभात
साक्षीला तोच चंद्रमा
तुझ्या मुग्ध ओठात
विसरलो मी क्षणात
त्या आठवणींनी मुग्ध झालो
तुझ्या प्रेमात वाहलो
तूच माझ्या ह्रदयात
फिरुन येशिल का पुन्हा एकांतात

स्म्रुतीची पाने पुन्हा येऊ लागली
तुझ्या डोळ्यात पुन्हा वाचली
स्पर्शाच्या सुगंधात विसरु कसा
मी तुला एकांतात
तुच माझ्या ह्रदयात
फिरुन येशिल का पुन्हा एकांतात

तुझे डोळे हे जुलमी गडे
सांगुन जाते एका क्षणात मला
पापण्यांच्या पंखात जवळी
मिटुन घेशिल का मला
विरहाचे क्षण संपतील माझ्या मनात
तूच माझ्या ह्रदयात फिरुन येशिल
का पुन्हा एकांतात
स्वरचित काव्य    प्रभाकर भस्मे
                         9757135696

Vikas Kachare