गंभीर कविता

Started by Prabhakar bhasme, October 04, 2016, 11:44:37 AM

Previous topic - Next topic

Prabhakar bhasme

" आठवणींची माळ "

का कळेना कसे घडले?
अर्ध्या वाटेवर स्वप्न भंगले
ओठावरला घास गेला
रंगलेला डाव अर्ध्यावरच संपला...

स्वप्नांची दुनिया विखरुन गेली
आशेची स्वप्ने भंग झाली
आधाराचा वृक्ष कोसळून गेला
रंगलेला डाव अर्ध्यावरच संपला...

कपिलेची हाक येऊन गेली
आठवणींची माळ हातात राहिली
डोळे पुसून दिवस गेला
रंगलेला डाव अर्ध्यावरच संपला...

मायेची पाखरे दूर गेली
तुझ्याविन पोरकीचं राहिली
यशाची शिखरे राहून गेली
रंगलेला डाव अर्ध्यावरच राहिला...

स्वःरचित काव्य - प्रभाकर भस्मे , ठाणे
                          ९७५७१३५६९६