कविता II वाटत ओंजळीत समुद्र घ्यावा II

Started by siddheshwar vilas patankar, October 04, 2016, 03:26:35 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

वाटत ओंजळीत समुद्र घ्यावा

चूळ  भरावी अन शोषावे ते सर्व मीठ

शुद्ध पाणी सोडावे नीट कालव्यामध्ये

बळीराजास आहेर द्यावा

ढग आले तरी चालतील अन गेले तरी चालतील

पाऊस पडला तरी चालेल

नाही बरसला तरी चालेल

फक्त सूर्याने त्याचे काम करावं

उन्हाने पाणी शोषून घ्यावं

हिरवं गार करेन मी जग चुटकीसरशी

कातळातून पण झाडे उगवतील भेगेसरशी

नष्ट करेन शहर आणि गावातला दुरावा 

दिसेन तिथे चूळ मारेन

जागोजागी दिसेल तुम्हाला

प्रेमाचा अन फक्त पाण्याचा ओलावा

कल्पना जरी असली तरी ती माझी आहे

मी इथे जरी असलो तरी

हि माती माझी आहे

चालू देत राजकारण

पाण्यावरून कितीही

भिकार नाद सर्व लागून राह्यलेत

फक्त ध्यास हवा बदलाचा

बाकी सर्व विनाकारण


सिद्धेश्वर विलास पाटणकर Ċ
सिद्धेश्वर विलास पाटणकर C