कविता II कितीही गुणिले आणि भागिले , उत्तर शून्यच यायचे II

Started by siddheshwar vilas patankar, October 04, 2016, 03:48:37 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

इतर गरम गरम ढोसतात

मी एकच असा असेन

कि ज्याला वर जाणाऱ्या

वाफा मोजायला आवडतात

चहाची तळमळ

त्या येणाऱ्या वाफेतून व्यक्त होते

शेवटच्या घोटापर्यंत येता 

अखेर ती नष्ट होते

कधी मोजल्या आहेत का किनारी बसून

येणारे तरंग अन लाटा

जीवनाचे गुपित दडले आहे

मोजा म्हणजे सापडतील

यशाच्या अन नाते संबंधांच्या नव्या वाटा

वेगळे गणित त्याचे

आपण केवळ आकडे त्याचे

कितीही गुणिले आणि भागिले

उत्तर शून्यच यायचे

नीट बघा सावध व्हा वेळीच

हि वेळ परत नाही येणार

ज्याला बाकी कळली

तोच वर स्वर्गात जाणार

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C