कविता II स्तोत्रे उदंड जाहली , अन संस्कारपण II

Started by siddheshwar vilas patankar, October 04, 2016, 07:02:25 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


स्तोत्रे उदंड जाहली

अन संस्कारपण

माती मोल ठरता नाती

सारी ती फोल ठरली

सुरुवात तर गणेशाने

पण लक्षुमीचा दास कायम

शेवट झगडा अन क्रोधाने

लढे तू फक्त त्वेषाने

बालसंस्कार अनेक ते

चिलखत स्वतःस समजे

अभेद्य भेदता यौवनी

जे काय पेरले तेच उगवते

सृष्टीचा नियम जाण

दाणा पेरता पीक मिळे

तोच दाणा राखता स्वतःस

धरणीतून फक्त भीक मिळे

किती खाशील एक वदनी

किती राखशील दोन हात घेऊनि

उडणार जे उडायचे

विष पेरता विषच जन्मे

प्रेम नाही मिळायचे

गड्या, प्रेम असते फक्त पेरायचे

तरच ते पुढे उगवते


सिद्धेश्वर विलास पाटणकर C






सिद्धेश्वर विलास पाटणकर C