हे परमेश्वरा,मला दुःख दे...!

Started by Rajesh khakre, October 05, 2016, 05:26:16 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

हे परमेश्वरा, मला दुःख दे...!

पिळवटून टाकेल ऊर, असा काही रुख दे
हे परमेश्वरा, मला दुःख दे...!

या जगात असतील नसतील त्या सर्व वेदना दे
छिन्न-विच्छीन्न होईल सर्व असा एक प्रवास दे
पायात रुततील अनंत काटे असा काहीसा मार्ग दे
रक्तबंबाळ करतील मजला अशा खुप जखमा दे

घायाळ होईल पूर्णपणे असा एखादा अपघात दे
स्वर्ग नकोच मजला तो निपचित पडलेला नरक दे
फुलांचा सुगंध नको बोचर्या काट्यांची सरबत्ती दे
खुप पेटवले दिप उजेडाचे मज न संपणारा अंधार दे

वादळ दे,तूफ़ान दे, कड़कडणारी वीज दे
इवल्या या पापण्यात माझ्या आसवांचा महापुर दे
रणरणते उन्ह दे, सावलीचा अभाव दे
कोरडया पडलेल्या गळ्याला असहय अशी तहान दे

मनातला आकांत दे, अविरत ते रुदन दे
आग दे,वणवा दे, पेटलेले काही श्वास दे
समस्यांचे जंगल दे, त्रासांचा सुकाळ दे
मनस्ताप दे,अपमान दे,न सुटणारा नि:श्वास दे

माझ्या देवा तु मला सतत अविरत हे सर्व दे
राहिले असेल अजुन काही ते ही तु पाठवून दे
हट्ट एवढाच देवा माझा तक्रार मानु नये
हे सर्व देतांनी सोबत लढण्याची शक्ती ही दे

लढेल मी पडेल मी,जगण्यासाठी धड़पडेल मी
तु दुःख नाही दिले तर सांग कसा घडेल मी
कोलमडेल मी,तड़फडेल मी, लाचार ना कधी होणार मी
दुःखातही जेव्हा हसेल मी, ही खुमारी दे
बेसुमार दे..!

दुःखाला स्वतःच निर्मु:ख होऊ दे
हे परमेश्वरा, मला दुःख दे...!
©राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com.