तुझ्यासाठी.

Started by Balaji lakhane, October 06, 2016, 08:36:10 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

................. तुझ्यासाठी..................

तुझ्याच हातात आहे आता प्रिये माझे जिवन,
तुझ्या माझ्या मनाचे होऊदे आज संगम.!

तू पाहतच आहेस ना परी माझी अवस्था,
विचार फक्त तुझेच काय सांगू माझी व्यथा.!

वेड मन माझं तुझ्या मनाशीच बोलत असतो,
माझ्या प्रेमाच्या कवितेत तुलाच पाहत असतो.!

खुपच तुझ्या प्रेमात वाहत आहे गं राणी,
तुझा हात माझ्या हातात केव्हा देशील गं राणी.!

मी फक्त अन् फक्त तुझाच गं झालो आहे,
तुझेच नाव घेऊन ह्रदय माझे धडधडत आहे.!

तुझ्या पासुन खुप दूर जाण्याचा रोजच प्रयत्न आहे,
तुझे बोलणारे नयन आजून जवळ आणत आहे.!

रोज रोज तुझ्यासाठीच प्रेमाची गाणी लिहीत आहे,
आपल्या प्रेमाचे संगीत मी गाण्याला लावत आहे.!

------------बालाजी लखने(गुरू)--------------