कविता II असं एक गाव हवं होतं , जे थोडंसं नवं होतं II

Started by siddheshwar vilas patankar, October 06, 2016, 12:33:31 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar

असं एक गाव हवं होतं

जे थोडंसं नवं होतं

थोडं माझ्या मनाप्रमाणे

थोडं जनाप्रमाणे

जागोजागी बंधारे असतील बांधलेले

पाण्यामध्ये प्रेम असेल लपलेले

मातीचा सुगंध असेल चंदनावाणी

सकाळ संध्याकाळ सर्व गातील मधुर गाणी

सोबत झाडाला पैसे असतील लटकलेले

एक गाव , थोडं नवं , थोडं जुनं

जिथं प्रत्येकाचं मन असेल सोनं

जरी असला हा माझा ध्यास

उभं असेल ते माझं गाव

ज्याला नसेल कुठलीच वेस

ना असेल कुठलं बंधन

दिवास्वप्न बघतोय

तुम्हाला वाटणार नाही खरं

पण मी आजही त्याच गावात राहतोय

एकटाच राहून, तुमची वाट पाहतोय

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C