त्या चिंतेची शेवटची शेकोटी शेकत बसला.

Started by randivemayur, October 09, 2016, 02:27:13 AM

Previous topic - Next topic

randivemayur

तुझी त्या शालूगत तंतोतंत दिसणारी ती
चार खांद्याच्या वर निजली होती
पाहताच अंगावर काट्यानचं कवच आलं
डोळ्यात गंगेचा एक थेम्ब साचला
हुंदका येण्या आधीच गिळला
अग ..अग ..अग म्हणत
आत्मा स्मश्यानात शिरला,तोवर
थोड्या येळंन ...
जीवाचा विस्तु त्या स्मशानभूमीत गेला
त्या चिंतेची शेवटची शेकोटी शेकत बसला.
परत ..परत...परत ..परत


#डोंगरी

#मयूर रणदिवे 9422705007