पावसाला सांग काही

Started by Parshuram Sondge, October 09, 2016, 06:58:06 AM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge

पावसाला तू सांग  काही  रे
त्याचे थांबण्याचे नाव नाही
मिठ्ठीत चिंब तुझ्या  अशी
पेटून आल्या या  दिशा दाही

निथळ थेंबाची नक्षी  कशी
पानांच्या त्या ओठावरती
सांगू कशी कुणाला रे प्रिया
ओले स्पर्श गंध अंगावरती
. . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
. . . 9673400928




Pprshu1312