बंधन....!!!

Started by Ashok_rokade24, October 09, 2016, 02:16:06 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

अद्रुष्य धागे बंधनांचे ,न कधीच दिसले ,
मनाशी नाते मनाचे , न कधीच ऊमजले  ॥

नजरेत नीत ओढ भेटीची दाटली ,
भावना अंतरीची ओठी न आली ,
शब्द नजरेचे न कधीच ऊमजले ,
स्वप्न मनीचे मनातच विरून गेले ॥

मन जखमी तुझे , वेदना मज जाहली ,
भावना मनीची तुज , न कधी ऊमजली ,
मिटून नयन नित , स्वप्न तुझे पाहीले ,
भाव ह्रदयातील तुज ,न कधी कळले ॥

अस्वस्थ जीवन माझे ,नित व्यथीत राहीलो ,
ऊध्वस्त आयुष्य माझे ,नित सावरीत बसलो ,
संसाराच्या चक्रा मध्ये , शरीर गुंतुन गेले ,
कर्म नीत करीत आहे , ह्रदय शून्य झाले ॥

अद्रुष्य धागे बंधनाचे , न कधीच दिसले ,
मनाशी नाते मनाचे , न कधीच ऊमजले ॥
                          अशोक मु. रोकडे.
                           मुंबई.