माझी चूक...???

Started by Ashok_rokade24, October 09, 2016, 02:29:50 PM

Previous topic - Next topic

Ashok_rokade24

चूक माझी असी ही, जीवनी ह्या आलो ,
भोग हे भोगता भोगता , मलाच हरवून गेलो ॥

कलहात जन्मलो ,कलहात वाढलो,
कलहाची साथ अजूनही सुटेना ,
शोधीले  क्षण ते आनंदाचे गवसेना ,
व्यथित जीवन भोगीत सुखासी अंतरलो ॥

सहानुभूती च्या ओझ्याखाली जीव दबला,
ममता प्रेम जिव्हाळा, कधी अर्थ नकळला,
नाव माझे गाव माझे स्वार्थ कुणी साधला,
असुन सभोवती सारे नित भयभीत राहिलो॥

एक झुळूक आली अचानक, जीवन सुगंधी झाले,
क्षणभंगुर ठरले सारे, स्वप्न अधुरे राहीले ,
पुन्हा न ऐसा बहर कधी जीवनी या आला,
अंधारात जीवनाच्या मलाच हरवून बसलो ॥

क्षण सुखाचे वेचून घेती ,आयुष्यातील साथी ,
दुखः वेदना त्यांच्या चुका सारे माझ्या माथी,
जोखडाखाली मान, धडपड ही सुटकेसाठी,
न उरले त्राण आता, शरण नियतीला गेलो ॥

बंध हे रेशमी सदा जिवापाड जपले,
स्वार्थ असे उरी,न कुणी माझे झाले,
तरीही जपणे बंध मला, जे सदा जपत आलो,
वहाणे ओझे अंतापर्यंत, जे नित वहात आलो ॥

भोग हे भोगता भोगता, मलाच हरवून गेलो ॥
भोग हे भोगता भोगता, मलाच हरवून गेलो ॥
                                अशोक मु. रोकडे.
                                मुंबई.






Ashok_rokade24


चूक माझी असी ही, जीवनी ह्या आलो ,
भोग हे भोगता भोगता , मलाच हरवून गेलो ॥

कलहात जन्मलो ,कलहात वाढलो,
कलहाची साथ अजूनही सुटेना ,
शोधीले  क्षण ते आनंदाचे गवसेना ,
व्यथित जीवन भोगीत सुखासी अंतरलो ॥

सहानुभूती च्या ओझ्याखाली जीव दबला,
ममता प्रेम जिव्हाळा, कधी अर्थ नकळला,
नाव माझे गाव माझे स्वार्थ कुणी साधला,
असुन सभोवती सारे नित भयभीत राहिलो॥

एक झुळूक आली अचानक, जीवन सुगंधी झाले,
क्षणभंगुर ठरले सारे, स्वप्न अधुरे राहीले ,
पुन्हा न ऐसा बहर कधी जीवनी या आला,
अंधारात जीवनाच्या मलाच हरवून बसलो ॥

क्षण सुखाचे वेचून घेती ,आयुष्यातील साथी ,
दुखः वेदना त्यांच्या चुका सारे माझ्या माथी,
जोखडाखाली मान, धडपड ही सुटकेसाठी,
न उरले त्राण आता, शरण नियतीला गेलो ॥

बंध हे रेशमी सदा जिवापाड जपले,
स्वार्थ असे उरी,न कुणी माझे झाले,
तरीही जपणे बंध मला, जे सदा जपत आलो,
वहाणे ओझे अंतापर्यंत, जे नित वहात आलो ॥

भोग हे भोगता भोगता, मलाच हरवून गेलो ॥
भोग हे भोगता भोगता, मलाच हरवून गेलो ॥
                                अशोक मु. रोकडे.
                                मुंबई.