तुझाच उल्लेख..

Started by Balaji lakhane, October 09, 2016, 06:02:53 PM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

-------------!!तुझाच उल्लेख!!-------------

तुला आठवत अश्रु गाळत मी लिहित आहे,
कवितेची वाट धरून प्रेम माझे मांडत आहे.!

समजून घेशील तू कधीतरी कविता वाचून माझी,
अश्रु वाहत वाहत आठवण काढशिल तू माझी.!

पाहताच तुला पहिली वेळ देह माझे तुझे झाले,
कवितेच्या प्रत्येक ओळीत फक्त तुलाच लिहीले.!

सुसाट्याचा वारा सुटला आता गं परी प्रेमाचा,
वाऱ्या सोबत वाहत आहे स्वप्न तुझ्या सोबत जगण्याचा.!

मीच मनाला बोलत आहे कसे वेड लागले या जिवाला,
काय केली तिने जादू माझे जिवन अर्पन केले तिला.!

प्रत्येक शब्दात मी लिहिली माझ्या प्रेमाचीच कहाणी,
लिहिता लिहिता तिलाच बनवलं माझ्या शब्दांची राणी.!

-----------!! बालाजी लखने (गुरू) !!---------
               उदगीर जिल्हा लातुर
               भ्र.८८८८५२७३०४