जीवन गाणे

Started by yallappa.kokane, October 09, 2016, 11:19:50 PM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

जीवन गाणे

जीवन गाण्याला सुर, आज मला मिळाले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।धृ।।

होता अबोला दुःखाचा, शब्द फुटत नव्हते।।
काळीज चिरून सुर, कधीच जुळत नव्हते।।

सुर्यापरी तेज अंगी, आज संचारून गेले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।१।।

उजळून दाही दिशा, गेला पळून अंधार।।
नाही कोणी सोबती, फक्त आसवांचा आधार।।

दु:खाशी करून सामना, जगण्यास बळ आले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।२।।

जीवन गाण्याला सुर, आज मला मिळाले।।
झंकारली तार कोणी, जीवन धन्य झाले।।धृ।।

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०५ ऑक्टोबर २०१६


९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर

ashokrashmi




अंगालि शीवुन वारा झालाय सैराट
अन पाऊस पडतोय भंनाट
ढगाचा चालाय गडगडाट
अन वीजांचा चालाय कडकडाट
अंगालि शीवुन वारा झालाय सैराट
मनात होतोय कलकलाट
जीवाचा होतोय तडफडाट
कसा रोकु हा जळफळात
दाखवाना कोणी पळवाट
दाखवाना कोणी पळवाट
अशोक प़धान