कविता II नाद नाय करायचा , या येड्या मराठ्याचा II

Started by siddheshwar vilas patankar, October 12, 2016, 04:52:55 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar



नाद नाय करायचा

या येड्या मराठ्याचा

रिकीब अन घोडे लयास असतील गेले

भले तलवार म्यांन ती दरबारी

रंजले गांजले तरी

रक्तात कायम खुमारी

भ्रमनास निघतो आम्ही

लावूनी छातीला माती

जिव्हेनी छाटतो उभा आडवा

अडवता वाट कुणी

मौजीबंधनात मुक्त कायम

गुलाम केवळ स्वतःचे

गुंजारव आम्हास प्रिय

हाच आमुच्या रक्ताचा नियम

षडरीपूंनि  घाट केला

आमचा शंभू राजा लयास गेला

नुकतीच धडधडू लागली होती पात

हराम्यांनी केला घात

देउनी खानाच्या हातात

राजाचे करूनि हालहाल

शेवटी काढली त्याने खाल

राजे गुर्मीत कायम

राजे भगव्यात खुशाल

हीच रग हाच रंग

अजून कायम आम्हात

नाद नागा करू आता

येडी येडी मराठ जमात 

सिद्धेश्वर विलास पाटणकर C
सिद्धेश्वर विलास पाटणकर C